HW News Marathi
महाराष्ट्र

तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे घेणार मेळावा, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई। गुढीपाडवा निमित्ताने मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षानंतर मनसेचा मेळावा आज (२ एप्रिल) शिवाजी मार्चमध्ये होणार आहे.

मनसेच्या वर्धापनदिनी बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत हा तर केवळ ट्रेलर आहे पिक्चर तर पाडवा मेळाव्यात पाहिला मिळेल, असे म्हटले होते. यामुळे राज ठाकरे आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसेच्या मेळाव्यात ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. राज्य मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे आगामी काळात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. यामुळे मनसेच्या आजचा मेळावा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे. मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली होती. तेव्हा सभेत एकच हर्षा पिकला होता. आता आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाची नक्कल करू टीका करणारा

राज ठाकरे आजच्या मेळाव्यात ‘या’ मुद्द्यावर बोलणार

1. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अयोध्येला आपण का जायचे, ही भूमिकाही राज ठाकरे जाहीर करणार आहेत.

2. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही भाष्य करतील विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही ते भाष्य करणार आहेत.

3. भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेची जागा खाली झाल्यानंतर ती जागा घेण्याचा प्रयत्न अजूनही म्हणावा तसा मनसेकडून पाहायला मिळत नाही. याबाबत देखील उद्या राज ठाकरे बोलू शकतात अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

4. येत्या महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडतील. महापालिकेतील भ्रष्टाचार व नागरी समस्या यावरून राज ठाकरे हे सरकारवर ठिकातीपणी करतील.

5. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काय आदेश देणार येणाऱ्या निवडणुकांना पाहता पक्षप्रमुख राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या दरम्यान ते नक्की कोणते आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केले असे आयोजन

मनसेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून  वाहतुकीचे निर्बंध आज दुपारी २:०० ते रात्री १२:०० पर्यंत अंमलात राहतील.

१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धीविनायक मंदीर जंक्शन ते एम.बी. राऊत रोड)

२. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.

३. एम.बी. राऊत मार्ग, (एस.व्ही एस रोड) दादर.

४. पांडुरंग नाईक मार्ग (एम.श्री. राऊत रोड) दादर.

५. दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर.

६. दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र . ४ ते शितलादेवी रोड) दादर.

७. एन.सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब…”,अमृता फडणवीसांचा शायरीतून सरकारला टोला

News Desk

“अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरुन तुम्हाला ठोकलाय”

News Desk

महाराष्ट्रात नको दिल्लीत जागरण करा! छगन भुजबळांचा विरोधकांवर निशाणा

News Desk