मुंबई | मुकेश अंबानी प्रकरणात वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या सचिन वाझे पोलिस दलातून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडून सचिन वाझेंना चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे. सध्या वाझे हे कोठडीत असून, आता मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. या संपुर्ण प्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेली स्कॉर्पिओ जीप आणि त्यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘एनआयए’ विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत ‘एनआयए’ कोठडी सुनावली आहे.
तब्बल १३ तासांच्या कसून चौकशीनंतर ‘एनआयए’ने शनिवारी मध्यरात्री वाझे यांना अटक केली होती. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली जीप उभी करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप ‘एनआयए’ने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर ‘एनआयए’ने रविवारी सकाळी त्यांची सर जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती.
महाविकासआघाडी सरकार या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुद्दा भाजपने उचलून धरला होता. दरम्यान, सचिन वाझे यांना अखेर निलंबित केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१५ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. बराच वेेळ त्यांच्यात चर्चा झाली असून सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
सचिन वाझे यांना १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ६ जून २०२० रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार सचिन वाझे, राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्यात आले होते. मात्र, अँटिलिया स्फोटके प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये वाझेंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch: Mumbai Police PRO, S Chaitanya to ANI
He was arrested by NIA in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani's house in Mumbai. pic.twitter.com/ent3Il45bA
— ANI (@ANI) March 15, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.