HW News Marathi
महाराष्ट्र

देशात एका दिवसात एक कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण, यात कसला मोठेपणा? राष्ट्रवादीची टीका!

मुंबई। देशात दरदिवशी एक कोटी कोरोनावरील लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत तर महाराष्ट्रात दरदिवशी 20-25 लाख लोक लसीच्या दुसर्‍या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटी लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.देशात एका दिवसात एक कोटी लसींचा टप्पा पूर्ण करण्यात आला, तसाच महाराष्ट्रात एका दिवसात 11 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा आहे

देशात एका दिवसात एक कोटी लसींचा टप्पा पूर्ण करण्यात आला, तसाच महाराष्ट्रात एका दिवसात 11 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत जास्त लस साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

एकूण लसीकरणापैकी 20 टक्के लसीकरण

पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात एक लाख 15 हजार जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्यांदा लसीकरणाने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात लसीकरणाने ७७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी 20 टक्के लसीकरण हे एकट्या पुणे विभागात झाले आहे. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण हे पुणे जिल्ह्यात झाले आहे.

पुणे शहरात 30 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण!

पुणे शहरानं कोरोना लसीकरणाच्या मोहीमेत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पुण्यात 30 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत 30 लाख 46 हजार 995 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आज एका दिवसात 63 हजार 993 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पुणे महानगरपालिकेनं याबाबत माहिती दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्वराज्य यात्रा संपली कि राष्ट्रवादी देखील संपेल !

News Desk

मला खडसेंच्या उमेदवारीची अपेक्षा होती,पण…

Arati More

मोठी बातमी ! पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी दिला मुख्यमंत्र्यांकडे अखेर राजीनामा

News Desk