HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला संजय राऊत!

मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे नुकतीच सपत्नीक शरद पवारांची भेट घेतली होती. आणि आत्ता लागलीच पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. तर राऊत हे वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र संजय राऊत हे अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्यानं आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल आहे.

या चर्चा होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाविकास आघाडीचे चालक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, आणि शरद पवार संजय राऊत या दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्या संदर्भातही पवार राऊतांकडून माहिती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही बैठक किती वेळ चालेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिल आहे.

राज ठाकरे संजय राऊत भेट

याआधी देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचे नवे घर गाठत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी भेट झाली होती. आणि राऊत हे शिवतीर्थावर देखील सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचे नवे घर गाठले. राऊत यांनी राज यांची भेट घेतली असली तरी या भेटीमुळे देखील एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं होत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अतिवृष्टीमुळे कोळशाचा पुरवठा आणि उत्पादनात घट”- कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी

News Desk

विरोधीपक्षाचे 19 आमदार निलंबित

News Desk

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

News Desk