टोकियो। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची अदिती अशोकचे मेडल अगदी थोडक्यात हुकले आहे. एका स्ट्रोकमुळे तिला ब्रॉन्झ मेडलनं हुलकावणी दिली. शुक्रवारी भारताची मेडलची आशा गोल्फर अदिती अशोकवर होती. वर्ल्ड रँकिंगमध्ये 179 व्या क्रमांकावर असलेल्या अदितीनं या ऑलिम्पिकमध्ये अनेक अव्वल खेळाडूंना मागे टाकले. अदिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मेडलच्या शर्यतीमध्ये होती. मात्र अखेर शेवटच्या तिला मेडलनं हुलकावणी दिली. अदिती 15 अंडर 269 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर राहिली.
स्पर्धेत जोरदार कामगिरी
आदितीनं पहिल्या तीन राऊंडमध्ये जोरदार कामगिरी केली होती. अदितीनं शुक्रवारी 3 अंडर 68 कार्ड खेळले. त्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर होती. अदितीची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये ती 41 व्या क्रमांकावर होती. त्यानंतर तिनं या स्पर्धेत जोरदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले.
A 4️⃣th place finish to end a stellar #Tokyo2020 performance from @aditigolf, so close to a medal finish! 💔
Well done, Aditi. Whole of #IND cheered for you today and the last three days 👏#UnitedByEmotion | #StrongerTogether
— Olympic Khel (@OlympicKhel) August 7, 2021
9 व्या वर्षी जिंकली स्पर्धा
अदितीनं वयाच्या 5 व्या वर्षीच वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोल्फ खेळण्याचं ठरवलं. तिनं वयाच्या 9 व्या वर्षीच पहिली स्पर्धा जिंकली. त्यानंतर 12 व्या वर्षी ती नॅशनल टीमची सदस्य बनली. महिलांची युरोपीयन टूर स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय आहे. 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी ती सर्वात कमी वयाची गोल्फर ठरली.
कुस्तीपटू रवी दहियानं भारतासाठी
पहिले सिल्व्हर मेडल मीराबाई चानूने 24 ऑगस्ट रोजी जिंकले होते. त्यानंतर पीव्ही सिंधू आणि लवलीना बोरगोहेन यांनी बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले. भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं गुरुवारी ब्रॉन्झ मेडलची कमाई करत भारताला चौथे मेडल मिळवून दिले. त्यानंतर कुस्तीपटू रवी दहियानं भारतासाठी दुसरे सिल्व्हर मेडल जिंकले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.