HW News Marathi
Covid-19

राज्यात फक्त पुढचे १० दिवस पुरेल इतक्याच लसी शिल्लक ! केंद्र सरकारला लिहिले पत्र

मुंबई । राज्यासह देशभरात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा सातत्याने वाढत असल्याने शासन-प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे देशभरात सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज(१७ मार्च) राज्यातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल लोकांना माहिती दिली. यावेळी, कोरोनालसीकरणाबाबत लोकांना पडलेल्या सर्व प्रश्नांचे, शंकाचे निरसन करताना महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लसीकरणाबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण १८८० सेंटर्स महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत आपण ३३ लाख ६५ हजार ९५२ एवढ्या लोकांना लस देण्यात आली आहे. सद्यस्थितीत या लसीकरणाच्या घटकांमध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी, ६० पेक्षा अधिक वय असणारे व्यक्ती व ४५ पेक्षा जास्त वय असलेले कोमॉर्बिड लोकांचा समावेश आहे. आपण आता ३ लाखाच्या गतीने लसीकरण करायचा निर्धार केलेला आहे. मात्र, जर त्या गतीने लसीकरण करायचे असेल तर त्यासाठी लागणारी लस देखील तेवढ्याच गतीने राज्याला प्राप्त होणे महत्त्वाचे आहे”, असे सांगत आरोग्यमंत्री राज्याला होणाऱ्या लसींच्या पुरवठ्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.

राज्याला आवश्यक लसींच्या पुरवठ्याच्या आकडेवारीबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “राज्याला येत्या ३ महिन्यांमध्ये साधारणतः २ कोटी २० लाख डोस आवश्यक आहेत. त्यासाठी दर आठवड्याला आपल्याला अंदाजे २० लाख डोस आवश्यक आहेत. याच २० लाख डोससाठी मागणी आपण केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे केली आहे.” राज्य सरकार लस पुरवठ्यासाठी आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांना देखील याबाबत पत्र लिहिण्यात आल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तर सद्यस्थितीत, दररोज ३ लाख लसीकरणाप्रमाणे विचार केला तर, फक्त १० दिवसांचा पुरवठा राज्याकडे उपलब्ध असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आतापर्यंत ३१ हजार ३३३ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजारांवर

News Desk

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा! – डॉ. राजेंद्र शिंगणे

Aprna

“…नाहीतर मी पेट्रोल टाकून गाडी फुकून देईन”, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

News Desk