HW News Marathi
महाराष्ट्र

सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार !

मुंबई | ‘सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार,’ असे वक्तव्य विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भेटीसंदर्भात बोलताना केले आहे. फडणवीस पुढे म्हणले की, मनसे आणि भाजप यांच्यासोबत एकत्र येण्याची शक्यता नाही, असे म्हणत त्यांनी मनसे-भाजप युतीच्या सर्व चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला आमच्या विचारमध्ये अंतर असून भविष्यात मनसेचे कार्यपद्धती बद्दली तर विचार होईल, असे सूचक विधान देखील फडणवीसांनी आज (९ जानेवारी) एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

दरम्यान, मनसे आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून, त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे हिंदुत्वाचा आधार घेणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेट महत्वाची असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.तसेच मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती म्हटले की, “लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दादर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

News Desk

नया है वह! अब्दुल सत्तार यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा टोला

Aprna

“इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा ‘तो’ व्हिडिओ वायरल

News Desk