HW News Marathi
महाराष्ट्र

पडळकरांच्या जीवाला काही झाले तर…!; पत्राद्वारे फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. तसेच पडळकरांच्या जीवाचे काही वाईट झाल्यास त्यांची जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकारची आहे, असा इशारा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडकरांच्या जीवाला धोका आहे. या पार्श्वभूमीवर फडवीसांनी मुख्यमंत्री, राज्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र पाठविलं आहे.

सध्या पडळकर हे एसटीचं राज्यात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांसबोत आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पडळकरांच्या गाडीवर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. तसेच सांगली देखील पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला झाला होता.

फडणवीस पत्रात नेमके काय म्हणालं.

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करित असताना. तसेच बहुजनांच्या हक्काचं लढे लढत असतात. यामुळे दुखावलेलं लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करताना दिसून येत आहेत. तथा सत्तापक्षातील संबंधित लोक हे हल्लं करताना दिसत आहेत.

लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारची ही जबाबादारी आहे की, स्वपक्षीय असो की विरोधक ज्याच्या जीवास धोका आहे, त्यांना सरक्षण दिले पाहिजं. सातत्यांच्या या घटनांमुळे पडळकरांच्या जीवास धोका निर्माण झाला असून त्यांना राज्य सरकारतर्फे तातडीने सुरक्षा पुरवण्याची गरज आहे. त्यांच्या जीवाचे काही वाईट झाल्यास त्यांची जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकारची आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhangar Reservation । सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले !

News Desk

राष्ट्रपती निवडीनंतर राज्यात शिवसेनेला सत्तेतून डिच्चू ?

News Desk

घरोघरी राष्ट्रवादीची घडी!, परळी शहारत प्रत्येक रविवारी धनंजय मुंडे मतदात्यांच्या दारी

News Desk