HW News Marathi
Covid-19

Pravin Darekar HW Exclusive : केंद्रानेही राज्याला आर्थिक मदत केली पाहिजे, भाजपची प्रामाणिक भावना !

मुंबई | महाराष्ट्र कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्य कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे. “केंद्राने राज्याला निश्चितपणे आर्थिक मदत केली पाहिजे, अशी भूमिका भाजपची आहे,” असे मत विराध परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीला बोलताना सांगितले. “केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक मदतही केली पाहिजे. राज्यसह देशातून कोरोना हद्दपार झाला पाहिजे,” अशी प्रांजळ आणि प्रामाणिक भूमिका भाजपची असल्याचे प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मांडली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक मदत मागितली, या प्रश्नावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, राज्या सरकारने जर आर्थिक मदतीसाठी केंद्राकडे विशेष पॅकजे मदत माहिती आहे तर द्राने राज्याला निश्चितपणे मदत केली पाहिजे, अशी भूमिका भाजपची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने राज्यातील सरकारला मदतही केली पाहिजे. राज्यसह देशातून कोरोना हद्दपार झाला पाहिजे,” अशी प्रांजळ आणि प्रामाणिक भाजपची भूमिका असल्याचे प्रविण दरेकरांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून भाजप हे सामाजिक भावनेतून काम करते, यांचा लेखाजोखासमोर येणे आवश्यक असल्याचे मत ही प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधरण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रला वेगळे पॅकेज द्याला हावे का, या प्रश्वावर बोलतान प्रविण दरेकर म्हणाले,

विरोधकांनी केलेल्या सूचना आरोप नाहीत

कोरोनासारख्या संकटाच्या वेळी एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण सर्वांनी वस्तूस्थितीला समोरे गेले पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनासंदर्भातील राज्य सरकाराल दिलेल्या सूचना मात्र, त्यांनी याला टीका आणि आरोपाच्या भावनेने न घेता. विरोधाकांशी चर्चा करून उत्तर मिळू शकत नाही, अशी भावाना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना म्हणाले. विरोधपक्षाने दिलेल्या सूचनाशी चर्चा करून राज्यातील कोरोनाचे आकडे कशी कमी करता येईल. याकडे राज्य सरकारने लक्ष देतील आणि आपले राज्य कसे कोरोनामुक्त होऊ, याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असल्याचे प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

राज्यातील जनतेला भीती वाटू नये म्हणून चित्र आशादायी आहे असे सांगणे यात गैर नाही, अस वाटत मत प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. वैद्यकीय उपकरे, यंत्रणा हवी असेल तरयासाटी यात गती आणे, आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहेत. केंद्राचे पथक राज्यात आले ते काही कोणत्या राजकीय उद्देशाने आले नाही. तर राज्यातील कोरोना रुग्णांची वाढत्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक आले. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्राच्यामाध्यमातून मार्गदर्शनक सूचना करत कोरोना नाश व्हावा, अशी भावना राज्यप्रमाणे केंद्राची देखील आहे, असे प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हणाले. राज्यात कोणाचे सरका आहे. यापेक्षा कोरोनाला एकत्रिपणे वस्तूस्थिती स्वीकारून त्यावर उपायोजना करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे.

प्रविण दरेकर यांची संपूर्ण मुलाखत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून अजिंक्य राहाणेंनी केले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे कौतुक

News Desk

वुहानमध्ये पुन्हा सर्व नागरिकांची होणार कोरोना चाचणी

News Desk

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, पुण्याहून मुंबईला हलवण्यात येणार

News Desk