HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधी पक्ष आता मनसेलाच काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोबत घेतील !

मुंबई | “राज्यातील विरोधी पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. तो केवळ कागदावर उरलेला आहे. ते आता मनसेलाच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोबत घेतील”, असा बोचरा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत भेटी तसेच राज ठाकरे यांनी नुकतीच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत घेतलेली भेट या सर्व पार्श्वभूमीवर मनसे येत्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या सोनिया गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी संजय राऊत यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली होती. “दिल्ली हे देशातील राजकीय घडामोडींचे केंद्रच आहे. त्यामुळे तिथे अशा भेटीगाठी होतच राहतात. आम्ही इथे कोण कोणाला कशासाठी भेटतो याची डायरी घेऊन बसत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे “काही लोक जर सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला जाऊन भेटण्यात कुणाची हरकत नसावी”, असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली! – मुख्यमंत्री

Aprna

Bhima Koregaon : गौतम नवलखा, डॉ. आनंद तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

News Desk

भोकर आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी महेश नारलावार

News Desk