HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रो कारशेडला विरोध: प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ला अटक करून घेतली

मुंबई | मेट्रो कारशेडच्या विरोध केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वत:ला अटक करून घेतले आहे. आंबेडकर आज (६ ऑक्टोबर) आरे कॉलनीत आंदोलन करण्यासाठी गेले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात पवई निटी याठिकाणी आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध केला.

आरेविरोधात केल्याप्रकरणी पोलीसांनी प्रकाश आंबेडकर यांना अटक केली आहे. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी आतापर्यंत २६०० पैकी १८०० झाडांची कत्तल करण्यात आली आहेत. या वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्या २९ पर्यावरण प्रेमींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच १०० हून अधिक जण ताब्यात होते त्यांना सोडण्यात आले आहे. आरे कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ अद्यापही पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : राज्यातील प्राणी संग्रहालये व वन्यप्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घ्यावी !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात घेतला मोठा निर्णय

News Desk

छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या!

Aprna