HW Marathi
महाराष्ट्र

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा एसटी सोडण्याचे आदेश

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर गर्दी करतात. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिह्यातून जादा एसटी बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

रायगडावर यंदा ५ व ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजी राजे यांनी जादा बस सोडण्यासाठी महामंडळाकडे विनंतीपत्र पाठवले होते.

Related posts

पुण्यात इंजिनिअरसह पत्नी, मुलगा मृतावस्थेत

Ramdas Pandewad

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार कसून तयारी

News Desk

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk