HW News Marathi
महाराष्ट्र

मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा, पंकजा मुंडेंचे आवाहन

परळी । कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि १२ डिसेंबर हा जन्मदिवस साजरा करावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे. यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी. सर्वांनी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात समाज माध्यमाद्वारे दिलेल्या संदेशात पंकजा मुंडे म्हणाल्या की, १२ डिसेंबर हा दिवस आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणा, उर्जा व जीवनामध्ये आशा देणारा दिवस आहे. मुंडे साहेब हयात असताना आपण सर्व हा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने व उत्साहाने साजरा करतो होतो. आज ते हयात नाहीत, परंतू आपल्यासाठी ते स्वाभिमानाची प्रेरणा देणारे संघर्षाचा महामेरू आहेत. १२ डिसेंबर हा जन्मदिवस आणि ३ जून हया स्मृतीदिनी आतापर्यंत गोपीनाथ गडावर मोठ मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे व संभाजीराजे आदींनी उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली. यंदा मात्र दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नसणार आहे.

रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा

यंदा सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पध्दतीने १२ डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. मोठे नेते, मोठी सभा, गर्दी टाळायची आहे. मी स्वतः १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी ११ ते २ वा. पर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी १२ ते १५ डिसेंबर दरम्यान ठिक ठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असल्याने मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्णन सोशल मिडियावर द्यावेत, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानभवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई व्हावी !

News Desk

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार! – अजित पवार

News Desk

जिल्हा परिषदे आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणार, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna