नागपूर | १२ ते १४ मार्च २०२२ या कालावधीत नागपूर येथे ३ दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत विदर्भात एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी.एम.पार्लेवार, एमएसएमई- विकास संस्था, नागपूर यांच्यावतीने हा ३ दिवसीय महोत्सव आयोजित केला जाणार आहे. विदर्भातील सर्व उद्योग संघटना या कार्यक्रमाला पाठिंबा देत आहेत. या महोत्सवाच्या बॅनरचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
एमएसएमई क्षेत्र हे गेल्या पाच दशकांतील भारतीय अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत गतिमान क्षेत्र आहे. मोठ्या उद्योगांपेक्षा तुलनेने कमी भांडवली खर्चात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहेच पण ग्रामीण आणि मागासलेल्या भागांच्या औद्योगिकीकरणातही हे क्षेत्र मदत करते. केंद्र सरकारच्या नाविन्यपुर्ण “मेक इन इंडिया” चे पाठबळ, आत्मनिर्भर भारत अभियानासह, एमएसएमई क्षेत्र जलद वाढीसाठी आणि प्रमुख जागतिक मूल्य साखळ्यांसह एकत्रीकरणासाठी सज्ज आहे.
खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रमुख आकर्षण मेगा नॅशनल इंडस्ट्रियल एक्स्पो हे असेल. मोठे उद्योग, केंद्र/राज्य सरकारच्या पीएसयू – सार्वजनिक क्षेत्र उपक्रम कॉर्पोरेट्स, एमएसएमई, स्टार्ट अप्स, आयटी/आयटीईएस, वित्त, संशोधन आणि शैक्षणिक संस्था या एक्स्पोमध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या विविध पैलूंवर आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, क्लस्टर डेव्हलपमेंट, व्हेंडर डेव्हलपमेंट आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन, निर्यात प्रोत्साहन आणि आयात स्वदेशीकरण, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्र यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल. इनोव्हेशन आणि स्टार्टअप्स, ऑटोमोबाईल सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, अॅग्रो आणि फूड प्रोसेसिंग, एनर्जी सेक्टर, डिफेन्स प्रोक्योरमेंट, क्रेडिट फॅसिलिटेशन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, प्लॅस्टिक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग सेक्टर, पर्यटन इत्यादी विषयावर परिषदा आयोजित करण्यात येतील. या परिषदांना लार्ज स्केल ऑटोमोबाईल, संरक्षण क्षेत्र, कॉर्पोरेट्स, केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी संबोधित करतील.
एमएसएमई मंत्रालयाच्या योजनेनुसार सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी स्टॉल-भाड्यावर अनुदान उपलब्ध आहे, अनुसुचित जाती जमाती महिला उद्योजकांसाठी १००% आणि सामान्य श्रेणीतील उद्योजकांसाठी ८०%. स्टॉल भाडयामध्ये सवलत मिळणार आहे. एमएसएमई -डीआय नागपूरने क्षेत्रातील उद्योजकांनी उद्योग आणि धोरण निर्मात्यांना त्यांची उत्पादने दाखवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.