HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजवर्धन हंगरगेकर चेन्नई सुपर किंग्समधून खेळणार

मुंबई । उस्मानाबाद जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणारा राजवर्धन हंगरगेकर हा आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. राजवर्धन हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमधील असून आयपीएलमध्ये खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे.राजवर्धन याच्या कर्तृत्वाने उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे

भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच जिंकलेल्या १९ वर्षाखालील विश्व वर्ल्ड कप स्पर्धेत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी राजवर्धन यांनी केली. ग्रामीण भागातील असूनही जिद्द मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे

आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स या संघात त्याला 1.5 कोटी रुपये मानधन देण्याचे ठरविले आहे. पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या एखाद्या भारतीय युवा खेळाडूला मिळणाऱ्या या मानधनावरुन या खेळाडूची गुणवत्ता लक्षात येते

उस्मानाबाद जिल्हा वाशीयांकरीता ही अभिमानाची बाब आहे. तर राजवर्धन यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेवासा पोलीस ठाण्यातील PI बाजीराव पवारांना निलंबित करा, गोपीचंद पडळकरांची मागणी

Aprna

‘आगे आगे देखो होता है क्या?’, भूजबळांच्या मुक्ततेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

News Desk

राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यावर केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले…

News Desk