मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ६ राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचं पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ब्रेक द चेन अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावली अनुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या ६ राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे या ६ राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय असणार आहे. तसेच या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटलं आहे
कोविड संदर्भातील सर्व नियमाचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या सहा राज्यातून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करुनच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
Maharashtra govt declares Kerala, Goa, Rajasthan, Gujarat, Delhi-NCR, & Uttarakhand as 'Places of Sensitive Origin'; passengers travelling from these places will need negative RT-PCR test report within 48 hours of the travel to enter Maharashtra pic.twitter.com/m8zNug4yRE
— ANI (@ANI) April 18, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.