HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे कालवश 

पुणे | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपल्या उत्कृष्ट कामाने मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले आहे..पुण्यातील खासगी रुग्णालयात आज (१९ एप्रिल) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या सोबत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. सोप्या पद्धतीने सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट त्यांनी दिले. ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ अशा अनेक चित्रपटांना सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यासारखी जोडी लाभली होती.

सुमित्रा भावे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार

बाई – १९८५ – सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट

पाणी – १९८७ – सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट

वास्तुपुरुष – २००२ – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

देवराई – २००४ – सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट

अस्तु – २०१३ – सर्वोत्कृष्ट पटकथा

कासव – २०१६ – सर्वोत्कृष्ट चित्रपट

राज्य शासन पुरस्कार विजेते चित्रपट

दोघी

दहावी फ

एक कप च्या

वास्तुपुरुष

नितळ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ED कोठडी

Aprna

फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार !

News Desk