HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा पण ‘तो’ सर्व्हे मी पाहिलेलाच नाही !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या एकीकडे तणावपूर्ण स्थिती असताना दुसरीकडे राजकारण देखील सुरु असलेले पाहायला मिळते. कोरोनाच्या स्थितीतही राज्यात नेतेमंडळी आणि सर्वच पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिपण्या सुरूच आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (६ जून) फेसबुकच्या माध्यमातून पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी बोलताना पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला देखील लगावला आहे. एका सर्व्हेनुसार, उद्धव ठाकरे हे सध्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या आज (६ जून) झालेल्या लाईव्ह पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने असा प्रश्न विचारला कि, “एका सर्व्हेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तुमचे मत काय ?” या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणले कि, “मी हा सर्व्हे पाहिला नाही. हा सर्व्हे कुणी केला तेही मला माहीत नाही. मात्र, सोशल मीडियावर नजर तुम्ही टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल कि मुंबईसह महाराष्ट्राची काय दैना झाली आहे. त्यामुळे यातून दिसून येते कि कुणाची किती लोकप्रियता आहे ?. मात्र, तरीही जर एखाद्या सर्व्हेत उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ही’ लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल ! | मुख्यमंत्री

News Desk

विरार रूग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी । छगन भुजबळ 

News Desk

ग्रीन झोनमधील दारुच्या दुकानांना केंद्राचा ग्रीन सिग्नल

News Desk