HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आमचा रंग भगवाच आहे आणि आमचा अंतरंग सुद्धा भगवाच !

मुंबई। “ना आम्ही रंग बदलला, ना आम्ही अंतरंग बदलला. आमचा रंग भगवाच आहे आणि आमचा अंतरंग सुद्धा भगवाच आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२३ जानेवारी) शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये दिली आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “प्राण गेला तरी चालेल तरीही मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटे बोलणार नाही, म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो. जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केले. उघडपणाने केले. चोरुनमारुन केले नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी नुसता उद्धव ठाकरे नाही, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही, मी लढणारा आहे.” तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न झाला. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केली. मी जी जबाबदारी स्वीकारली होती, ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे अंतरंग भगवंच आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान करीन’ असे वचन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना दिले होते. ते वचन पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा सोहळा होता. यानिमित्ताने शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन केले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेनेतील ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर रश्मी ठाकरे यांची पारंपारिक पद्धतीने ओटी भरण्यात आली. या सत्कारानंतर सगळ्यांना मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.

 

Related posts

रिझर्व्ह बँकेच्या कामात केंद्राने हस्तक्षेप केलेला चालणार नाही !

News Desk

विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी ईडीचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर !

News Desk

संजय राऊतांसह रामदास कदम राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना

News Desk