HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातय – सुप्रिया सुळे

मुंबई। शिवसेना नेते व परिवनहमंत्री अनिल परब यांना आज ईडी कडून नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खबळबळ माजली आहे. यावर आता राज्यातील नेते मंडळींकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील वर्धा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली.”आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही . कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल्या जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.” असं त्या म्हणाल्या आहेत.

एखाद्या विरोधी पक्षनेत्यांची किती कामं मुख्यमंत्रीकडे असतात

तर, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर उत्तर देताना, एखाद्या विरोधी पक्षनेत्यांची किती कामं मुख्यमंत्रीकडे असतात. आम्ही दोन्हीकडे राहिलो आहेत. त्यामुळं आम्हाला चांगलं माहीत आहे. एखाद्या विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्री यांची भेट घेतली तर गैर काय?” असं म्हणत पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला.

अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार

तर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलत्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करावे! – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर या!”, अनिल परबांचं आवाहन

News Desk

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या

News Desk