HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला!

अलिबाग। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनीवर सुटका जरी झाली असली मुक्तता अद्याप झालेली नाही. महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन दिल्यानंतर राणेंना आता आज (सोमवारी) पोलिसांसमोर हजेरी लावावी लागणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने 30 तारखेला अलिबाग एनसीपीकडे हजेरी लावण्याचा आदेश घालून दिला होता. त्यानुसार आज नारायण राणे अलिबाग पोलीस स्टेशनला एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे.

जातमुचलक्यांवर जामीन दिला होता

नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळे परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. नारायण राणे उद्या अलिबाग येथे हजेरी लावण्याची शक्यता आहे. कोर्टाने 30 ऑगस्ट रोजी हजेरी लावण्याचे आदेशामध्ये नमूद केले आहे, असं एपीआय गावडे यांनी माहिती दिली.24 ऑगस्ट रोजी महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी राणे यांचं वय आणि प्रकृती पाहता महाड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला. 15 हजार जातमुचलक्यांवर जामीन दिला होता.

जनआशीर्वाद यात्रेचा अखेर समारोप झाला

तसंच, महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश कोर्टाने नारायण राणे यांना दिले आहे. त्याचबरोबर, भविष्यात यापुढे असे वादग्रस्त विधान करणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली होती.दरम्यान, नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा अखेर समारोप झाला. अखेरच्या सभेत सुद्धा नारायण राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. तसंच, ‘शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे. आमच्या सारख्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहे’ असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात झाली चोरी 

News Desk

मलिकांच्या प्रकरणांचं सर्व पुरावे शरद पवारांकडे देणार!; फडणवीसांचा इशारा

Gauri Tilekar

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत – नाना पटोले

News Desk