HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आमचा ध्यास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत दिवाळीच्या (Diwali) शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी (Loan Waiver), पोलीस भरती (Police Recruitment), नोकर भरती (Servent Recruitment) यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. राज्याच्या विकासाच्या (State Development) दृष्टीनेही आपण प्रयत्न करत असल्याचं यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ”गेले दोन वर्ष आपल्यावर कोरोनाचे निर्बंध (Covid Norms) होते. मात्र, यावर्षी सर्व सण निर्बंधमुक्त आणि मोकळ्या वातारवणात साजरे करत आहोत. सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे, तसेच कामालाही गती मिळाली आहे. महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत.”

बाळासाहेब ठाकरे यांचा देखील उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ”बाळासाहेब नेहमी सांगायचे समाजकारण आणि राजकारणात समाजकारणाला प्राधान्य द्या. आनंद दिघे यांनी देखील सर्वाना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवले. म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आमचा ध्यास असल्याचं ते म्हणाले आहेत.”

 

75 वर्षावरील जेष्ठाना मोफत एसटी बस योजना… 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ”राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठाना मोफत एसटी बस योजना सुरु केली. गेल्या 52 दिवसात या योजेनचा एक कोटीपेक्षा जास्त जेष्ठानी लाभ घेतला. दिवाळीसाठी शिधा पत्रिका धारकांना केवळ 100 रुपयात आनंदाचा शिधाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरफच्या मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेवर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना चार लाख कोटींची मदत मिळत आहे”, असं ते म्हणाले आहे.

 

पोलीस भरतीला आम्ही सुरुवात केली आहे… 

शिंदे म्हणाले की, पोलीस भरतीला आम्ही सुरुवात केली आहे. 20 हजार पोलीस शिपाईची पदे भरण्याची प्रकारीया सुरु करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील विविध विभागातील 75 हजार पदांची भरती लवकरच भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. ते म्हणाले की, आरोग्यासाठी दुप्पट निधी देण्याचा प्रयत्न आहे. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे औषध केंद्र सुरु करणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरु आहे. वाहतूक आणि औषध खर्चसाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही! – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

Aprna

अदर पूनावाला यांनी केली मोठी घोषणा!

News Desk

मोदींनी दिला जय अनुसंधानचा नारा

News Desk