HW News Marathi
महाराष्ट्र

नव्या वर्षात  महाराष्ट्राला नवा पोलीस महासंचालक मिळणार?

मुंबई | २०२१ या नव्या वर्षात महाराष्ट्राला नवा पोलीस महासंचालक मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पोलिस महासंचालक कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी काही जणांची नावे शर्यतीत आहेत. बिपिन बिहारी , हेमंत नगराळे , संजय पांडे आणि रश्मी शुक्ला हे चार अधिकारी पोलिस महासंचालकपदाच्या रेसमध्ये आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले आहेत. त्यांच्या जागी कुणाला पसंती मिळणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून ठाकरे सरकार आणि सुबोध जयस्वाल यांच्यात मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. आता सुबोध जयस्वाल यांनी दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानं ठाकरे सरकारनं त्याला हिरवा कंदील दिला. त्यामुळे नववर्षात नवा पोलीस महासंचालक कोण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात सध्या पोलीस महासंचालकपदासाठी चार नावं चर्चेत आहेत.

पोलीस महासंचालकांच्या रेसमध्ये कोण?

-बिपिन बिहारी, १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी, गृहनिर्माण विभागाचे प्रमुख आहेत

-हेमंत नगराळे, १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी, सध्या त्यांच्याकडे कायदा विभागाची जबाबदारी आहे.

-संजय पांडे, १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत सध्या ते होमगार्ड विभागाचे प्रमुख आहेत

-रश्मी शुक्ला, १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी, नागरी हक्क विभागाच्या प्रमुख आहेत

पोलीस महासंचालकपदाच्या रेसमधील दुसरं नाव बिपिन बिहारी यांचंही आहे. बिहारी हे ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे मानले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना दहशतवाद्यांकडून धोका होता. तेव्हा बाळासाहेबांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला. पण बिपिन बिहारी यांनी बाळासाहेबांना विनंती करून सुरक्षा घेण्यात सांगितलं. तेव्हापासून बिहारी आणि ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत. पण येत्या दीड-दोन महिन्यात बिहारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते महासंचालक झाले तर त्यांना मुदतवाढही द्यावी लागेल. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार राजकीय सद्यस्थिती याचा विचार करत नवीन पोलिस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत!

News Desk

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळेल या अनुषंगाने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार- डॉ. गोऱ्हे नीलम

News Desk

बीडमधील परळी वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला RDX ने उडवण्याची धमकी

News Desk