HW News Marathi
महाराष्ट्र

तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकिर्दी एवढंही नाही, हर्षवर्धन पाटलांची लेक तांबेंवर गरजली 

इंदापूर | युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील संधीसाधू असल्याचा घणाघात तांबे यांनी केला आहे. तांबेंच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील ताबेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत”, अशा शब्दात शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

“युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती”, असा बोचरा वार अंकिता पाटील यांनी केलाय.“राज्यातील ज्येष्ठ नेत्यावर बोलताना काही सुसंस्कृतपणाचे संकेत असतात ते त्यांनी पाळायला हवे होते. परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. शेवटी मोठ्या नेत्यावर बोललं म्हणजे आपण मोठे होत नसतो तर त्यासाठी काम करावं लागतं”, असा टोला सरतेशेवटी अंकिता यांनी लगावला.

सत्यजीत तांबे काय म्हणाले होते?

युवक काँग्रेसचा इंदापुरात मेळावा पार पडला. यावेळी तांबेंनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर शरसंधान साधले होते. “इंदापूर तालुक्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे नाव आजही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नेता आदराने घेतो. पुणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पुढच्या पिढ्यांत तो विचार राहिला नाही किंबहुना संधीसाधूपणा आला. खरं तर शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला”, अशी टीका सत्यजीत तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदुरीकर महाराजांबाबत प्रसिद्धी मिळावी म्हणून बोलू नये,चाकणकरांचा तृप्ती देसाईंना टोला..

Arati More

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

News Desk

रक्तदान केल्यावर लगेच साईबाबांचं दर्शन

News Desk