HW News Marathi
Covid-19

लवकरच पत्रकारांनाही लोकल रेल्वे प्रवासाची सुविधा मिळणार

मुंबई | मुंबईत आरोग्य सेवा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेतून प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत असलेल्या पत्रकारांना अजून ही सुविधा देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी याविषयी चर्चा झाली. या भेटीनंतर, “येत्या आठवडाभरात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल”, असे आश्वासन मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहे.

“आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यात पत्रकारांना प्रवासाची परवानगी दिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारने कोरोना संकटात पत्रकारांनाही अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले आहे. या काळात धोका पत्कारून पत्रकार हे जनतेला माहिती देण्याचे आणि कोरोना विषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. सध्या पत्रकारांना अनेकदा वार्तांकन मुंबई, मुंबई उपनगर आणि अन्य शहरात जावे लागत आहे. त्यामुळे पत्रकारांनाही लोकल रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी”, अशी मागणी वार्ताहर संघाच्यावतीने मुख्य सचिवांकडे करण्यात आली.

“सध्या आरोग्य यंत्रणेसंबंधीत लोकांना लोकल रेल्वे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अन्य खासगी रुग्णालये देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मागणी करीत आहेत. त्यावर विचार करीत आहोत. त्यात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्याचा विचार आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय घेऊ”, असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे तर ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk

सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू झालेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल!

News Desk

मुंबईचा डबेवाला राज ठाकरेंच्या भेटीला, लोकल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका…

News Desk