HW News Marathi
महाराष्ट्र

ठरले ! राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींच्या विधान परिषद आमदारकीवर शिक्कामोर्तब

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बाग त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू शेट्टी विधानपरिषेदवर जाण्यास तयार झाले आहे. यामुळे आता राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या इच्छेला मान देत विधानपरषिदेवर आमदार होऊ जाणार यावर शिक्कमोर्तब झाला आहे.

या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे इतर नेते मंडळी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ११ जून रोजी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्या भेटीसंदर्भात ते म्हणाले, राजू शेट्टी म्हणाले, ” चार- पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील माझ्या आईची तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी निवासस्थानी आले होते. त्यावेळी आमच्या अनोपचारिक गप्पा झाल्या, त्या जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो मेल पाठविला होता. लोकसभेच्या वेळी जी चर्चा झाली होती. त्यानुसार विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देण्याचे ठरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांच्यासोबत एक बैठक घेऊन निर्णय करण्याचा प्रयत्न करू, अस जयंत पाटील म्हटल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. येत्या आठवड्यातभरात पवारसाहेब यांच्यासोबत बैठक होईल आणि त्या होय किंवा नाही यासंदर्भात निर्णय होईल,” असे ते म्हणाले.

राज्यपाल नियुक्तीच्या १२ जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ४ पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान राजू शेट्टींना जागा त्यांचे ठरले आहे. यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

येत्या आठवड्याभरात शरद पवारांशी चर्चा करून विधानपरिषदेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ | राजू शेट्टी

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna

…अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

News Desk