HW News Marathi
Covid-19

अखेर पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल!

नागपूर | विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे ७ टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस अखेर काल (२३ एप्रिल) रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली आहे. १९ एप्रिलला कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती.

महाराष्ट्रात कोविड संकटामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रेल्वेने रो रो सेवेद्वारे ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑक्सिजनच्या टँकरची वाहतूक करताना काळजी घ्यावी लागत असल्याने मध्य रेल्वेने घाट मार्ग न निवडता व्हाया वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जंक्शन ते विशाखापट्टणम असा लांबचा मार्ग निवडला.

 

विशाखापट्टणम स्टील प्लांट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरून ही ट्रेन महाराष्ट्रात आली आहे. काल संध्याकाळी ८ वाजता ही ट्रेन नागपूर स्थानकात पोहचली. लवकरच हा तिढा सुटून राज्यात कोरोना स्थिती स्थिर होण्याचे प्रयत्न सरकारचे सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीतील लॉकडाऊन आणखी ३ दिवस वाढला !

News Desk

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार | अजित पवार

News Desk

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांचे Prescription आवश्यक नसणार

News Desk