HW News Marathi
Covid-19

गोकुळवर सत्ता येताच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा

कोल्हापूर | गृहराज्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूधसंघाची निवडणूक जिंकताच एक मोठी घोषणा केली आहे. गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लान्ट उभारणार आहेत. सत्ता येताच सतेज पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील ऑक्सिजन प्लांटचा उल्लेख केला होता. राज्य सरकार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं मॉडेल राज्यभर राबवण्याच्या तयारीत आहेत.

गडहिंग्लजमधल्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला आहे. जानेवारीमध्ये हा प्लांट कार्यान्वित झाला आहे. ८० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्लांटमध्ये रोज १५० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भरू शकेल अशी क्षमता आहे. त्यामुळे या प्लांटमधील ऑक्सिजन सुमारे १०० रुग्णांना उपयोगी ठरू शकतो. हा ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी रोल मॉडेल ठरला असून, असे प्लांट राज्यभरातील उपजिल्हा रुग्णलयात उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे.

गोकुळ दूध संघावर सतेज पाटील-हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने विजय मिळवला. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. येथे एकूण २१ जागांपैकी तब्बल १७ जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महाडिक गटाला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk

थोडी माणुसकी असायला हवी होती, अजित पवारांची व्हेंटिलेटर्सच्या प्रश्नावर खंत

News Desk

मुंबईत आज १३९० नवे रुग्ण, तर दादरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत होतेय वाढ !

News Desk