HW News Marathi
Covid-19

परळीत ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित, आवश्यकतेच्या ४०% ऑक्सिजन रुग्णालयातच होणार निर्माण

बीड । अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट आज (२७ एप्रिल) कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्लांट द्वारे दर दिवसाला २८८ जम्बो सिलेंडर इतका ऑक्सिजन हवेतून वेगळा करून निर्माण होणार असून याद्वारे रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या ४०% ऑक्सिजन निर्माण होणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांच्यासह ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते एका व्हीडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. या ऑक्सिजन प्लांट मूळे रुग्णालयाला लागणारा 40% ऑक्सिजन मिळेल, उर्वरित ऑक्सिजनचा सध्या विविध माध्यमातून पुरवठा सुरू असुन, तो ऑक्सिजन देखील इथेच निर्माण केला जावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे शिफ्टिंग करणे शक्य नाही, मात्र तेथे सिलेंडर फिलिंग युनिट उभारून तेथून अन्यत्र सिलेंडर पुरवठा केला जाऊ शकतो, याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती धनंजय मुंडे यांनी तनपुरे यांना केली असून, याबाबतही ऊर्जा विभाग तातडीने सकारात्मक निर्णय घेईल असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अंबाजोगाई येथे प्लांट शिफ्टिंग व उभारणीचे काम अत्यल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे यावेळी धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरमध्ये कोरोना निगेटिव्ह असलेले रुग्ण निघाले पॉझिटिव्ह

News Desk

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी!

News Desk

राज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!

News Desk