HW News Marathi
Covid-19

पोकळ घोषणा देणारे माहविकासआघाडीचे सरकार नाही | मुख्यमंत्री

मुंबई | फक्त पॅकजे देऊन भागणार नाही, पोकळ घोषणा देणार नाही. पोकळ घोषणा देणारे माहविकासआघाडीचे सरकार नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला टोला लागवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२४ मे) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हणाले

नुकतेच भाजपने राज्य सरकारने केंद्रप्रमाणे आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी करत ‘मेरा आंगन, मेरा रंणागण’, असे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केले नाही. आज गोरगरीबांना अन्न मिळणे, उपचार मिळणे हे महत्वाचे आहे. आपण गरीबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिले. ७ ते ८ लाख मजूरांना घरी पाठवले, यासाठी कुठले पॅकेज द्यायचे? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारे महाविकास आघाडीचे सरकार नाही, अशी त्यांनी भाजपवर टीका केली.

दरम्यान, रस्त्यावर न उतरता घरुनच प्रार्थना करा आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा असे आवाहन मुस्लिम बांधवाना मुख्यमंत्र्यांनी केेले. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतेय. हा विषाणु गुणाकार करत जातो. मेच्या शेवटच्या आठवड्यात दीड लाख असतील असा अंदाज होता, प्रत्येक्षात मात्र, राज्यात आज ३३ हजार ७८६ पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन गेले आहे. राज्यात आतापर्यंत तीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत १ हजार ५७७ मृत्यू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

मुख्यमंत्र्यांच्या संबोधणातील महत्वाचे मुद्दे

  • शिक्षण, कृषी, अर्थ, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील परिस्थितीचा विचार
  • शेतकऱ्यांना बांधावर बी-बियाणे देण्याचा प्रयत्न
  • रत्नागिरीत टेस्ट लॅबला परवानगी. सिंधुदुर्गात व्हायरॉलॉजी सेंटरला परवानगी
  • वारीसंदर्भात बोलणी सुरू आहे. राजकारण करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. अडचणीच्या वेळी राजकारण करणे बसत नाही.
  • हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये. तुम्ही केले तरी आम्ही करणार नाही. महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. तुम्ही काही बोला, मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे.
  • शाळा बंद असल्या तरी शिक्षण कसे सुरू ठेवायचे हे पाहायचे आहे
  • महाराष्ट्राचे अर्थचक्र कसे चालवायेच यावर लक्ष
  • समाजातील प्रत्येक वर्गाला आपण दिलासा देत आहोत.
  • आम्हाला सर्व सुरळीत करायचे आहे, पण कोरोनाला टाळून करायचे आहे
  • राज्याने आतापर्यंत ४८१ ट्रेन सोडल्या. यामध्ये ७ लाखापर्यंत प्रवासी मजुरांची सोय केली. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  • दररोज ८० ट्रेनची मागणी करतोय पण आपल्याला ३० ते ४० ट्रेन आपल्याला दिल्या जात आहेत.
  • फक्त पॅकजे देऊन भागणार नाही, पोकळ घोषणा देणार नाही, पोकळ घोषणा देणारे माहविकासआघाडीचे सरकार नाही, अशा अपेक्षा असा टोली भाजपला लगावला
  • सरकारी रुग्णलयात १०० टक्के मोफत उपचार
  • प्रभावी अंबलमजावणीमुळे राज्यात रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात
  • महाराष्ट्रातील प्रत्येक विभाग आता प्रभावीपणे कोरोनाची लढा दिला
  • शिवभोजन योजनेतून १० लाख लोकांचे पोट भरले
  • रेशन कार्ड नसणाऱ्यांना धान्य देण्याची योजना आली
  • लक्षणे दिसली तर डॉक्टरांना दाखवावे, वेळेत दवाखाण्यात आल्यानंतर डॉक्टर वेळत उपचार करतील
  • आगामी काळात राज्यावर पाऊसाचे संकट येणार, सर्व रोगराईपासून लांब राहणे
  • रक्तदान करायचं आहे, त्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे
  • तुम्ही शिस्तपणे पाळली तर आकडे कमी होतील.
  • कोरोनाचा गुणाकार कोणतीही मर्यादा नाही, अनेक मैदाने, सभागृह आम्ही सज्ज केली आहे
  • मेच्या अखेरीत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध करून देणार
  • जेष्ठ व्यक्तींनी कोरोनाशी बरेहून घरी बरतले, अनेक नवजात बालकांना कोरोनाची लागण नाही. आता कोरोना गुणाकार होणार, रुग्णांच्या संख्येत वाढ केसे वाढणार
  • मेच्या शेवटच्या आठवड्यात दीड लाख असतील असा अंदाज होता, प्रत्येक्षात मात्र, राज्यात आज ३३ हजार ७८६ पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन गेले आहे. राज्यात आतापर्यंत तीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत १ हजार ५७७ मृत्यू
  • कोरोनासोबत जगायचे म्हणजे काय करायचे हे शिकावे लागेल
  • सरकारची सुरुवात झाली आणि कोरोनाचे संकट आले
  • होळीनंतर सगळे सण आपण शिस्तबद्ध पद्धतीने साजरे केले
  • ईद साजरी करताना घरातून बाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे मुस्लिम बांधवाना आवाहन केले
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणेकरांना दिलासा | पुण्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार, महापौरांची घोषणा

News Desk

राज्यात आज १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

News Desk

ठाण्यात लॅाकडाऊन! अधिवेशनानंतर मुंबई,पुण्यात लॅाकडाऊन होणार?

News Desk