मुंबई | पंढरपूरच्या चुरशीच्या लढतीत भाजपने बाजी मारली.भाजपची आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना फडणवीसांनी अजित पवारांना धूळ चारली.यानंतर महाराष्ट्रात सुद्धा असा पंढरपूरसारखा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार अशा चर्चांना उधाण आलयं,भाजपचे नेते तसे संकेत सुद्धा देत आहेत.
पंढरपुरमध्ये पटकावलेल्या विजयाचा जल्लोष काल भाजपच्या परिचारकांनी दंड थोपटून केला.तिकडे समाधान आवताडे आमदार होताच आजचं कामाला सुद्धा लागले आहेत.तर इकडे मुंबईत पंढरपूरच्या विजयात वाटा असणाऱ्या पडळकर,निंबाळकर,राहुल कुल,जयकुमार गोरे यांनी फडणवीसांची भेट घेतली.पडळकरांनी फडणवीसांना पेढा भरवून हा आनंद साजरा केलाय.आता फडणवीसांना पेढे भरवणारे पडळकर एकेकाळी भाजपवर तुटून पडत होते.मात्र भाजपमध्ये आल्यापासून त्यांनी राष्ट्रवादीवर टिकेची झोड उठवली आहे.आगामी काळात महाराष्ट्रात सत्तांतर होण्याच्या चर्चा चालु आहेत.या चर्चांचं नेमकं काय होत हे पाहण महत्वाचं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.