पंढरपूर | राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज (२ मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. मतमोजणीच्या केंद्राजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, पंढरपूरमध्ये मतमोजणीला अंतिम निकाल येण्यास १२ तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोरोनाच्या कठीण काळात ही मतमोजणीत सुरु असून सर्व काळजी घेण्यात येत आहे. मतमोजणी प्रतिनिधींना पीपीई कीट सुद्धा पुरवण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ही मतमोजणी होत असल्याने विशेष काळजी घेण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.