HW News Marathi
Covid-19

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक ! पंकजा मुंडेंना संताप अनावर

बीड । राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण चित्र पाहायला मिळत आहे. त्यापैकी एक जिल्हा आहे बीड. बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून तब्बल २२ मृतदेह कोंबून नेण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. “ज्यांच्याकडे बीड जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे ते आपले योग्य कर्तव्य बजावत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना सुनावले आहे.

पंकजा मुंडे याविषयी बोलताना म्हणाल्या, “२२ जणांचे मृतदेह सामानासारखा कोंबून भरून अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला. ही भयानक घटना अन्य कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्याची आहे. या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करावे की संताप हे मलाच कळत नाही. सरकारने बीड जिल्ह्यामध्ये अत्याचार करायचा ठरवले आहे. प्रशासनाने हात टेकले आहेत. ही परिस्थिती बीडचे भविष्य आणि वर्तमानासाठी अतिशय भयानक आहे”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.

“माझी भूमिका कधीच राजकारण करण्याची नव्हती. मी भूमिका घेत असताना नेहमीच बोल्ड भूमिका घेतली आहे. कारण ती जनतेच्या हिताची आहे. कदाचित मी स्वतःचं नुकसान केलं असेन पण मी माझ्या भूमिका प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडल्या आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये जे चाललंय ते पाहून माझी हात जोडून विनंती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी, शरद पवार साहेबांनी, अजित पवारांनी बीड जिल्ह्याकडे कृपया जातीने लक्ष द्यावे. कारण, आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते स्वतःचे कर्तव्य बजावत नाहीत हे वारंवार स्पष्ट झाले आहे”,असाही टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk

कोरोनावर सापडले औषध ! सौम्य लक्षणांवर ‘फेविपीरावीर’ औषधाला भारतात परवानगी

News Desk

….नाहीतर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना कडक सूचना

News Desk