HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी भाजपची कार्यकारणी जाहीर केल्यानंतर टीमचे केले अभिनंदन

मुंबई | भाजपने काल (३ जुलै) राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साईडलाईनला गेलेल्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस पद देण्यात आले आहे. तर विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या नेत्यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य विशेष निमंत्रित पद मिळाले आहे. पंकजा मुंडेंना मात्र कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले नाही आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना केंद्रात पाठवू असा शब्द दिला आहे.

भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप महाराष्ट्राच्या नव्या टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार, असे ट्विट पंकजा मुंडेंनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीत आणखी एका मोठ्या नेत्याची एन्ट्री!

News Desk

ट्विटरच्या माध्यमातून आव्हाडांनी पुन्हा एकदा डागली मोदी सरकारवर तोफ

swarit

राज्यात २२१ नवे रुग्ण, तर कोरोनाबाधितांची संख्या १९८२ वर पोहोचली

News Desk