HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive | “आमच्या मुलीला ‘हा’ स्ट्रेस होता”, पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

बीड । परळी येथील रहिवासी युवती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच पेटले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आता या प्रकरणात विशेषत्वाने पुढे येत असून विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सुरुवातीपासून हे प्रकरण पाहिले तर बरीच गुंतागुंतीची माहिती आणि खुलाशे समोर येत असल्याने हे प्रकरण नेमके काय ?हे स्पष्ट होत नाहीये. याच पार्श्वभूमीवर, राजकीय वर्तुळात अनेक चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलेले असताना HW मराठीने चव्हाणच्या वडिलांशी बातचीत केली आहे. पूजाच्या वडिलांचा याबाबतचा दावा काय आहे ? पाहूया

संपूर्ण प्रकरणावर पूजा चव्हाणचे वडील काय म्हणतात ?

HW मराठीच्या बीडच्या प्रतिनिधी सुकेशीनी नाईकवाडे यांनी पूजा चव्हाण हिचे वडील लहू चंदू चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना पूजाचे वडील म्हणतात की, “प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्या दाखवत आहेत. आधीच आमच्यावर दुःख आहे ते अजून वाढवत आहेत. आमचा पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी आम्हाला २०-२५ लाखांचं नुकसान झालं आणि यावर्षीही आम्हाला तेवढंच मोठं नुकसान झालंय. त्यामुळे देखील पूजाला स्ट्रेस आलेला असू शकतो. तिला आणखी एक आजार होता त्यामुळेही ती टेन्शनमध्ये असेल. आमचा कोणावरही संशय नाही. आम्हाला कोणालाही दोष द्यायचा नाही. त्यामुळे मी विनंती करतो की आमची बदनामी करणं थांबवा. सत्य समोर येईल तेव्हा येईल. मात्र, तोपर्यंत हे सगळं बंद करा”, असे पूजाच्या वडिलांचे म्हणणे आहे.

सविस्तर व्हिडीओ पाहा :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणे म्हणजे अक्षम्य चुक – रोहित पवार 

News Desk

मराठा आरक्षणचा एटीआर आज विधिमंडळात !

News Desk

CBSE १२ वीचा आज निकाल, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा

News Desk