HW News Marathi
महाराष्ट्र

तब्येत खराब असल्यानेच पंकजा मुंडे गैरहजर कोणीही वेगळा अर्थ काढू नये – प्रितम मुंडे

बीड | राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी आज (१ डिसेंबर) मतदान होत आहे. दरम्यान, या मतदानाच्या वेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गैरहजर आहेत. यावर भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तब्येत खराब असल्यानेच भाजप नेत्या पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर आहेत, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू नये, असं आवाहन प्रितम मुंडे यांनी केलं आहे. भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी गाडे पिंपळगाव येथे मतदानाचा अधिकार बजावला. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

मतदारांचा प्रतिसाद पाहता कौल आमच्याच बाजूने लागेल, विजय आमचाच होईल, असा विश्वासही खासदार प्रीतम मुंडेंनी व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. कोरोनाच्या काळामध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो, याबद्दल शंका होती. मात्र मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. गुलाल आमचाच असेल, असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला, तर बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी निवडणूक लढल्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम होईल, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

काय केले आहे पंकजा मुंडे यांनी ट्विट?

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की, आपण शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी, खोकला आणि ताप आहे. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला आधी जनतेने झिडकारलं, त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही झिडकारलं, भाजपची बोचरी टीका

News Desk

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’! – अतुल लोंढे

News Desk