HW News Marathi
महाराष्ट्र

“रोज आमचा एक नेता उठतो आणि सरकार पडणार सांगतो….”, पंकजा मुंडेंनी दिला भाजपाला घरचा आहेर

बीड | “मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे

भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावरुन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाला घऱचा आहेर दिला आहे. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडा असं आवाहन करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे” असंदेखील त्या म्हणाल्या

राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली. सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली. “आता काय बीड जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. एक रुपया तरी आहे का? माझ्याच योजना चालू आहे. आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे यांनी. यांचं काहीच चालत नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीर अभिनंदन करु,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही’, भास्कर जाधवांचा इशारा

News Desk

राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

Aprna

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी CBIला दिली परवानगी

News Desk