HW News Marathi
महाराष्ट्र

मुंडे साहेबांच्या पोटी जन्म हेच माझं भाग्य! – पंकजा मुंडे

नाशिक । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे काल म्हणजेच रविवारपासून तीन दिवसीय नाशिक दौर्‍यावर आहेत. शहरात येण्यापूर्वी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी त्यांनी नांदुर शिंगोटे येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य दिव्य स्मारकास भेट देऊन पाहणी केली. यावेळी, “मुंडे साहेबांच्या पोटी माझा जन्म हे माझं भाग्यच आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त करत पंकजांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून नांदूर शिंगोटे येथे आकर्षक स्मारक उभं राहिलं आहे. हा गोपीनाथ मुंडेंचा १६ फुटी पूर्णाकृती पुतळा आहे. राज्य सरकार पर्यटन विभाग व जिल्हा परिषदेच्या निधीतून हे स्मारक उभं राहिलं आहे. नांदूरशिंगोटे गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी रेणुकामातेचं जागृत देवस्थान याबरोबरच लोकनेते मुंडेंचं स्मारक साकारण्यात आल्याने येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. रविवारी सायंकाळी पंकजा मुंडे यांनी स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. शहरात आगमन होताच त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने वाजत-गाजत जल्लोषात स्वागत झालं.

पाहणीसाठी आल्या अन् सभाच झाली

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाची केवळ पाहणी करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांची यावेळी बघता बघता सभाच झाली, एवढी गर्दी येथे झाली होती. यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. पंकजा म्हणाल्या, “मुंडे साहेबांच्या पोटी जन्म हे माझं भाग्यच आहे. साहेबांचं जाणं आपल्या सर्वांसाठी वेदनादायक होतं. त्यांच्यासाठी मी माझा एखादा अवयवही दान केला असता पण ती वेळ नियतीनं येऊच दिली नाही. सर्व जाती धर्मात त्यांना मानणारे लोक होते. त्यांच्यावरील तुमच्या प्रेमाच्या नात्यापुढे सर्व फिक पडलं. वंचितांचं भलं करण्याचा विडा त्यांनी उचलला होता, त्याचं हेच काम आपण पुढे नेणार आहोत. माझयावर टीका करणारांना हेच सांगायचंय की, माझं नेतृत्व हे नाटक नाही समर्पण आहे. जो खरं समर्पण करतो तो लोकनेता होतो..साहेबांची हिच शिकवण होती. तुमची आणि माझी नाळ जोडलेली आहे असे सांगून दस-याला भगवान भक्तीगडावर आपण व्यसनमुक्तीचा जो संकल्प तरूणांना दिला आहे, तो अंमलात आणावा आणि हीच माझ्यासाठी भाऊबीज असेल असंही पंकजा म्हणाल्या.

भरगच्च कार्यक्रम

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज (१ नोव्हेंबर) व उद्या (२ नोव्हेंबर) रोजी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाशिक मर्चंट को-ऑप बॅकेच्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण, आ. देवयानी फरांदे, आ. सीमाताई हिरे यांच्या मतदारसंघात विविध लोकार्पण, उदघाटन, भाजप कार्यालयात कार्यकर्ता संवाद, माॅलचं उदघाटन आदी कार्यक्रम होणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आत्मविश्वास

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात ‘सीरम’मधील दुर्घटनास्थळी देणार भेट

News Desk

मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा!

News Desk