HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला…”, पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट

पुणे | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज (१६ मे) निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकिय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी, काँग्रेस नेत्यांनी रूग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील एक अभ्यासू नेता हरपला अशा शब्दांत भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

काय आहे पंकजा मुंडे यांची पोस्ट?

काँग्रेसचे नेते आणि खा. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला, आशा शब्दात भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेर यांनी सातव यांना आदरांजली वाहिली आहे.

महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीला रविवारी पहाटे धक्का देणारी घटना घडली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. राजीव सातव यांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली होती, मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २३ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या सातव यांची प्रकृती मध्यतरी बिघडली होती. नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडेंवर नाव न घेता टीका!!

News Desk

निर्मला सितारमण यांच्या ‘या’ महत्त्वाच्या मोठ्या घोषणा

swarit

अमृता फडणवीसांचं भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायांकडे ‘हे’ मागणं…

News Desk