HW News Marathi
महाराष्ट्र

१ वर्षापुर्वी पंकजा मुंडेंनी थेट भाजपला ललकारलं होतं !

मुंबई | भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांची आज (१२ डिसेंबर) जयंती. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ ला आजच्या दिवशी भाजप नेत्या आणि गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी स्वाभिमान दिनाच्या दिवशी भाषण केले होते. ज्यात त्यांनी चंद्रकात पाटील, एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर अशा दिग्गज भाजप नेत्यांसमोर भाजप विरोधी भूमिका मांडली होती. तिथूनचं पंकजा मुंडे पक्षांतर करणार का अशा चर्चा सुरू झाल्या.पंकजा मुंडे आजही भाजपात आहेत मात्र महाविकासआघाडीच्याही त्या तितक्याच जवळ आहेत.पंकजाचं गेल्या वर्षीचं भाषण महत्वाचं ठरलं होतं. पंकज मुंडेंच्या या भाषणातील काही महत्वाची वक्तव्ये…

पक्षाने ठरवायचं आहे

“मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भजापच्या कोर्टात आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवाय पंकजा मुंडेंनी भाजपच्या कोअर कमिटीचं सदस्यत्व सोडत असल्याचं जाहीर केलं. पक्ष काढायचा की काय करयचं ते पुढे ठरवूच पण आता पक्षाने ठरवायचं आहे, असं म्हणत पंकजांनी भाजपला इशारा दिला.

“एकनाथ खडसेंनी आज मन मोकळे केले. मन मोकळे नाही केले की विष बनते. माझ्या जीवनात अनेक भाषणं केली, पण मागच्या दोन महिन्यात मी बोलले नाही. गेली 2 महिने मी भाषण केले नाही. काय बोलावे असा प्रश्न आता पडतो. गरीबाच्या झोपडीत दिवा लागावा यासाठी मुंडे साहेबांचं काम होतं. तेच पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांनी मला तुमच्या झोळीत टाकलं. माझं भाग्य की मी त्यांच्या पोटी जन्मले”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

मला पदाची अपेक्षा नाही !

या भाषणात पंकजा म्हणाल्या , कोणी म्हणाले की पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत. प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी दबाव, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. जर पदाच्या हव्यासावरुन आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.मृत्यूनंतरही मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास सुरुच आहे. माझे भाग्य, मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला. माझे दुर्दैव, मला मुंडेसाहेबांना अग्नी द्यावा लागला. चिल्लर पराभवाने मी खचणारी नाही. 12 दिवस टीव्ही चॅनेलचे माझ्याकडे लक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.आधी टीव्ही लावला की संजय राऊत दिसायचे, ते बोलत होते, ते करुन दाखवलं, पण मी काही न बोलताही टीव्ही लावल्यावर दिसायचे, असंही पंकजा मुंडे म्हणाले होते.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्याचं मला एकाही सूत्राने सांगितलं नाही, डोळे चोळत उठल्यावर कळलं , असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांची भाजप बाबतची नाराजी त्यांनी उघडपणे मांडलेली पाहायला मिळाली होती.

गोपिनाथ मुंडेंचं रक्त आळणी नाही !

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथरावजींच्या हाती जनसंघाचा झेंडा. गोपीनाथरावांची समाधीही कमळावर आहे. फाटक्या लोकांनी माझ्यासाठी संघर्षयात्रा काढली होती, गोपीनाथ मुंडेंनी कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. नाथाभाऊ बोलले ते खरं आहे. गोपीनाथरावांचं रक्त आळणी नाही, गोपीनाथरावांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मला तुम्ही वाघीण म्हणता, विरोधकांना ते खुपते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

त्यामुळे पंकजांनी थेट भाजपला गेल्या वर्षी झालेल्या पराभवानंतर ललकारलं होतं.पंकजा मुंडे आज केंद्रीय पातळीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी आहेत.मात्र महाराष्ट्रात त्या शरद पवारांच कौतुक करतात तर कधी उद्धव ठाकरे आपल्याला भावासारखे आहेत याची आठवण करून देतात.त्यामुळे भाजपच्या पंकजा मुंडे या भविष्यात खडसेंप्रमाणे महाविकासआघाडीच्या होतील का हा प्रश्न सतत चर्चेत असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संविधानाच्या संरक्षणासाठी संघटित होणे गरजेचे! – यशोमती ठाकूर

Aprna

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

News Desk

PandharpurElection : भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित!

News Desk