HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांवर राजकीय वर्तुळातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सर्वशक्तिमान देव शरद पवारांना दीर्घायु्ष्य देवो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना चांगले आरोग्य लाभो, असंही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना तसेच पार्थ पवारांनी आपल्या आजोबांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

पार्थ पवारांनी म्हटलं आहे की, देशातील एका मोठ्या उंचीच्या नेत्याच्या शुभेच्छा, पवार साहेब खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण सर्वांसाठी प्रेरणा आहात, तरूणांना नेहमीच समाजसेवेसाठी मार्गदर्शन करत असता. आपणाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असं पार्थ यांनी म्हटलंय.

शुभेच्छा देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे.

तर भाजप नेते केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा त्यांनी ट्विट करत दिल्या आहेत.

तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांसोबत जयंत पाटील यांची बैठक

News Desk

खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार का? अजित दादा म्हणतात…

News Desk

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून! – नाना पटोले

Aprna