HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यनाथ कारखान्याच्या चोरी प्रकरणातराष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे निष्पन्न!

परळी | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणामागे राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या नगरसेवकाचा कसून शोध घेत असून काल तो पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे. मात्र त्याच्या इतर चार सहका-यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा असल्याचे समोर आले आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशाॅप गोदामातून नुकतेच संगणक संच, माॅनिटर, काॅपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ९४ हजार ९१४ इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादवि ४६१,३८० कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली.

या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल शेख रा. परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्यांच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्यांचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतुन तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना खासदाराला पडला उद्धव ठाकरेंचाच विसर, म्हणाले, ‘मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब!’

News Desk

पडळकरांच्या जीवाला धोका, संरक्षण देणं सरकारची जबाबदारीच! – सदाभाऊ खोत

News Desk

राणा दाम्पत्यांला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Aprna