HW News Marathi
Covid-19

पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे ट्विट करत म्हणाल्या आहेत की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी घरातच आयसोलेटेड आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांची चाचणी करुन घ्यावी, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. त्यांनी बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता. त्यानंतर मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. यानंतर त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आलाय. असं असलं तरी त्या घरीच विलगीकरणात थांबल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona World Update : जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाखांच्या वर पोहोचली

News Desk

#Coronavirus : जगात कोरोना बाधितांचा आकडा ४५ लाखांच्या पुढे

News Desk

मुंबईतून प्रत्येकी २५ विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफला परवानगी

News Desk