HW News Marathi
Covid-19

Corona World Update : जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाखांच्या वर पोहोचली

मुंबई | जगभरात आतापर्यंत ४३ लाख ३५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून २ लाख ९२ हजार ८१५ वर जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. जगात आतापर्यंत १६ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती वर्ल्डोमीटरही आकडेवारी दिली आहे. तसेच भारतात आतापर्यंत ७४ हजार २९२ कोरोना रुग्ण आहेत. तर देशात आतापर्यंत २ हजार ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्ये भारत बाराव्या स्थानावर असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

अमेरिकेने गेल्या २४ तासात १६३० लोक गमावले आहेत. तर एकूण बळी ८३ हजार ४२५ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या १४ लाख ८ हजारांवर गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये काल (१२ मे) १७२ बळी गेले. तिथे एकूण मृतांचा आकडा २७ हजार १७५ तर रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजारांवर गेली आहे. स्पेनने गेल्या चोवीस तासात १७६ लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा २६ हजार ९२० वर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासात इटलीत कोरोना रोगाने १७२ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या ३० हजार ९११ वर पोहोचली आहे. कालपर्यंत रुग्णांची संख्या १,४०२ ने वाढली, इटलीत आता जवळपास २ लाख २१ हजारावर रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

News Desk

११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

News Desk

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

News Desk