HW Marathi
बीड महाराष्ट्र राजकारण

महाविकास आघाडी सरकारने बीडला केवळ वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत,पंकजा मुंडेंचा आरोप

बीड | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्व सामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात ठोस तरतूद नसल्याने लोकहिताच्या अनेक योजना भविष्यात संकटात सापडतील,असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व सामान्य घटकाला अर्थसंकल्पातून कांहीच मिळाले नाही, त्यांच्यासाठी कोणतीही चांगली योजना सरकारने आणली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत सशक्त अभियान आम्ही सुरू केले होते, राज्यातील ग्रामपंचायतींचे बांधकाम २०२४ पर्यंत पुर्ण करण्याचा संकल्प सरकारने करावा अशी अपेक्षा आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळासाठी निधी दिला जाईल एवढाच मोघम उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, परंतु ठोस तरतूदीचा आकडा नाही, शिवाय हे मंडळ स्वायत्त असावे, राज्यमंत्री दर्जा असावा असा निर्णय होता, मागच्या सरकारनेही विलंब लावला पण या सरकारनेही याचे कसलेही स्ट्रक्चर केलेले दिसत नाही,असे त्या म्हणाल्या.

‘बीडच्या रेल्वेला केंद्राने ४४९ कोटी दिले, राज्यानेही भरीव तरतूद करावी अशी मागणी आपण केली होती, परंतु या अर्थसंकल्पात सरकारने रेल्वेला त्यांच्या हिश्शाची दमडीही अजून दिली नाही’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. याशिवाय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वाॅटरग्रीड मध्ये बीडचे नांव पूर्वीच्या सरकारमध्ये होते प्रथम यादीत होते, यावेळी लातूर, औरंगाबादचा उल्लेख झाला याचा आनंदच आहे पण बीडचा नाही हे दुःखद आणि दुर्दैवी आहे अशी खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारने बीडला केवळ वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. सॅनिटरी नॅपकिन महिला सक्षमीकरण याबद्दल ही मोघम उल्लेख आहे .स्त्री शिक्षण पोषण संरक्षण यावर ही ठोस योजना नाही .भाग्यश्री, मनोधैर्य ,सुमती बाई सुकळीकर, उमेद यासारख्या योजनांची मर्यादा वाढवली पाहिजे.

Related posts

#CoronaVirus : ठाकरे सरकारने आज घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

अपर्णा गोतपागर

यंदा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार !

News Desk

आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत !

News Desk