HW News Marathi
महाराष्ट्र

खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही ही फक्त चर्चा आहे – पंकजा मुंडे

मुंबई | अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी खडसेंच्या पक्ष बदलावर भाष्य केले आहे. उद्या (१७ ऑक्टोबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही. ही फक्त चर्चा आहे. जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच सोडून गेल्यावर नुकसान होतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच जोरदार पावसानं झालेल्या नुकसानीवरही त्यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बांधावर जावं, मी जेव्हा बोलते तेव्हा संपूर्ण सरकारविषयी बोलते, जलदगतीने निर्णय घ्यावा. राज्यभराच्या बांधावर जाऊ शकत नाही हे मान्य, पण बांधापेक्षा शेतकऱ्यांपर्यंत निर्णय पोहोचणे महत्त्वाचं असल्याचंही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना बाधितांची संख्या २८०१, आज ११७ नव्या रुग्णांची नोंद

News Desk

“मी गृहमंत्री होणार या बाजारातल्या गप्पा…”, जयंत पाटील यांनी केला खुलासा

News Desk

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk