HW News Marathi
महाराष्ट्र

“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”, शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडेंचे उत्तर

बीड | आज (२५ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. “मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भगवान गड येथील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंनी शिवेसेनेत प्रवेश करावा, असं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते. त्याला पंकजा मुंडेंनी पुर्णविराम दिला आहे.

दसरा मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. त्यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी नियोजन प्रकल्पांचे बळकटीकरण! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

“जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर…” भाजपचा शिवसेनेला थेट इशारा

News Desk

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणेकरांना कोरोना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन!

News Desk