HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी मला पक्षात घेतले नसते तर मी बाद झालो असतो –  एकनाथ खडसे

जळगाव | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आज (२५ ऑक्टोबर) एकनाथ खडसे यांनी जळगावात एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवारांनी मला पक्षात घेतलं नसतं तर मी राजकारणातून बाद झालो असतो. तशी परिस्थितीच माझ्यावर आणली होती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपला राम-राम ठोकून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी दिली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी खडसे यांचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खडसे यांनी पवारांचे आभार मानताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

शरद पवार यांनी मला पक्षात घेतलं नसतं तर मी राजकारणातून बाद झालो असतो. तशी वेळ माझ्यावर आणली गेली होती. मी जर राजकारणातून बाहेर गेलो असतो तर माझं नाही, पण तुमचं नुकसान झालं असतं, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. जळगावात ८० टक्के समर्थक माझे आहेत आणि उरलेले २० टक्के हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. येत्या काळात माझी काय ताकद आहे ते दाखवून देईन, असं थेट आव्हान खडसे यांनी भाजप नेत्यांना दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या मालमत्तेसाठी त्याला ड्रग्स दिले, प्रताप सरनाईकांचा दावा

News Desk

नवनीत राणा यांनी घेतला एक अनोखा निर्णय!

News Desk

राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे, मराठा तरुणांच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात !

News Desk