HW News Marathi
महाराष्ट्र

मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे – पंकजा मुंडे

मुंबई | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपची वाट सोडत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ऑफर देण्यात आली.त्या ऑफरवर पंकजा मुंडेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे. मी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची जुगलबंदी ऐकलेली आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत. या गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. भगवान गडावरून पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मला एवढ्या मोठ्या जमावासमोर बोलताना एक वेगळीच शक्ती अनुभवायला मिळते. ही सीमोल्लंघनाची परंपरा मुंडे साहेबांपासून चालत आलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संबंध देशात फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतो. गरीब आणि कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी येतो, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची स्थिती, आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय’, शरद पवारांनी व्यक्त केला संताप

News Desk

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीत समर्थकांची तुफान गर्दी

News Desk

IAS ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

News Desk