HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या स्टॅमिनाचे कौतुक,नविन राजकीय समीकरणांची सुरूवात?

पुणे | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेआणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर सगळ्यांना परिचत आहेच, अनेक दिवसानंतर शरद पवारांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हे दोनही नेते सोबत होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली,ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी पंकजा मुंडे या सातत्याने शरद पवारांकडे पाठपुरावा करत होत्या.

पुण्यात झालेल्या बैठकीनंतर पंकजा मुंडे या शरद पवारांच्या कामाने प्रभावित झाल्या आहेत .त्यांनी एक ट्विट करून शरद पवारांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे.शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे त्यांनी कौतुक केले आहे. पंकजा मुंडेंनी ट्विट केले आहे की , @PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे’.त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या ट्विटनंतर नवीन राजकीय समिकरणे पाहायला मिळणार का अशा चर्चा सुरू झाली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST बाबत महत्त्वाची बैठक; शरद पवार, अजित पवार आणि अनिल परबांमध्ये चर्चा सुरू

News Desk

पंडित नेहरुंचे योगदान नवीन पिढीला माहित व्हावे यासाठी राज्यभर कार्यक्रम राबवणार !- नाना पटोले

News Desk

‘उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा’ निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोप !

News Desk